ज्योतिर्मयी, नित्य नवा
ध्यासपदी ज्ञानदिवा
प्रेरक, संजीवक
तेजोत्सव हा, अंधार खुजा
करत राहू ईशपूजा ।
ईशपूजा ज्ञानदान
जागवीत आत्मभान
धर्मासह तंत्रज्ञान
ना प्रगतीचा मार्ग दुजा
करत राहू ईशपूजा ।
सेवाव्रत चालविले
लढण्याचे बळ वाढविले
स्फुलिंग मनी जागविले
होवो जगी आदर्श तुझा
करत राहू ईशपूजा ।
इथे शारदा नित्य वसे
शक्ती, लक्ष्मी नम्र असे
उज्ज्वलतेचे स्वप्न दिसे
कर्मयोगी व्हा, धरा ध्वजा
करत राहू ईशपूजा ॥
गीतकार: पुष्कराज मुणगेकर
गायक आणि संगीतकार: यशस्वी सरपोतदार
संगीत संयोजक: मिलिंद गुणे व अभय इंगळे